लोणावळा उपासना केंद्राविषयी

लोणावळा परिसराचा परिचय


  • एतिहासिक परिचय : लोणावळा हे निसर्गाने दिलेले एक वरदान. डोंगरदऱ्यांत, आकाशाशी झेप घेणारे रुद्राभिषण सुळके , त्यावर फेसाळत येणारे पाणी, गर्द वनराई, रोमांचक हवा, असे हे निसर्गरम्य थंड हवेचे प्रसिध्द ठिकाण. परमेश्वराचा स्पर्श झालेला हा भाग्यवान परिसर.
फार वर्षापूर्वी घडलेली घटना - नाथपंतीयांचे जनक श्री. नवनाथ ह्यांची मंत्रविद्या देवांचा राजा इंद्र याने चोरून एकली. तेव्हा नवनाथांने त्यास शाप दिला होता. त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी सह्याद्री पर्वतावर इंद्राने १२ वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्येच्या वेळी मंत्र म्हणूनजे पाणी सोडीत असे ते नदीच्या रुपात वाहू लागले. तीच ही लोणावळ्यातील पवित्र इंद्रायणी नदी.
  " || ऐसे ते मनकर्णिकांचे जीवन | इंद्रहास्ते पडले प्रवाही होऊन | तेणे नाम इंद्रायणी पडिले || "


अश्या या इंद्रायणीच्या कुशीत वसलेले, काळ्या कातळावर काढलेल्या कोरीव लेण्यावरून लोणावळा नाव पडलेले व पर्यटकांना आकर्षित करणारे शहर.


  • आध्यात्मिक परिचय: इंद्रायणी नदी च्या कुशीत वसलेल्या ह्या लोणावळा शहरास जसा ऐतिहासिक परिचय दिला जातो तसाच ह्याचा एक अध्यात्मिक परिचय सुद्धा आहे. 
  1.  श्री वरदविनायक (महड) : लोणावळ्याहून ६ मैलावर मुंबईकडे जाणाऱ्या वाटेवर महड या गावी हे मंदिर आहे.
  2. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर : लोणावळ्यापासून जवळच असलेल्या नांगरगाव येथे स्वामी भक्त नाना करंदीकर यांनी स्थापन केलेले हे सुंदर असे स्वामींचे मंदिर आहे.
  3. वागजाई मंदिर : खंडाळाच्या सुंदर व विशाल दऱ्याखोऱ्याच्या कुशीत वागजाई मातेचे मंदिर आहे. नवरात्रीत येथे अनेक भाविक येतात.
  4. एकविरा देवी मंदिर : लोणावळ्या जवळ असलेल्या कार्ला या प्रसिध्द लेणी जवळ एकविरा देवी माते चे मंदिर आहे. कोळीसमाजाचे आराध्य दैवत म्हणून दर वर्षी अनेक कोळी व इतर लोकही दर्शनासाठी इकडे येतात
       या शिवाय भांगरवाडी येथील राम मंदिर, गणेश मंदिर, गावठाण येथील भैरवनाथ मंदिर, शनी मंदिर, तुंगार्ली येथे असलेले जाखमाता मंदिर व त्याच बरोबर अनेक जैन धर्मियांचे जैन मंदिर, मुस्लीम धर्मियांचे प्रार्थना स्थळ इत्यादी. हे लोणावळ्याची अध्यात्मिक ओळख करून देते.

  • सामाजिक परिचय : अनेक मान्यवर लोकांनी एकत्रीत येऊन सामाजिक दृष्टीकोन ठेवत विविध सामाजिक संस्था स्थापन केल्या.
  1. शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित : कर्मचारीवर्गाला आधार वाटणारी ही पतसंस्था १९७७ साली स्थापन झाली.
  2. भारतीय अर्थाविद्या वर्धिनी : सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. वि. म. दांडेकर यांनी १९७४ साली या संस्थेची स्थापना केली.
  3. अंतर भारतीय बालग्राम : बुद्धिमान परंतु आर्थिक दुरावस्थेमुळे शिक्षणाला वंचित राहावे लागत असलेल्या लहान मुलांना समाजात न्याय व संधी मिळवून देण्यासाठी १९६६ साली ही संस्था स्थापित करण्यात आली.
  4. विभागीय पोलीस प्रशिक्षण केंद्र : पोलीस भरती व प्रशिक्षणासाठी या केंद्राची स्थापना१९६२ साली झाली.
  5. कैवल्यधाम : योगविद्येचे शास्त्रीयशिक्षण देणाऱ्या या संस्थेची स्थापना स्वामी कुवल्यनंद यांनी ७ ऑक्टोबर १९२४ मध्ये केली.
        या व्यतरिक्त प्राथमिक शिक्षक संघटना, श्री प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्याल, गिरीछंद हायकर्स, मन:शक्ती केंद्र, दी लायन्सहोम फॉर एजिंग ब्लाइंड्स, रोटरी क्लब इत्यादी संस्था लोणावळा शहराची शान वाढवतात.




लोणावळ केंद्राची अनिरुद्ध वाटचाल

रविवार दिनांक २८ जानेवारी २००१ रोजी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर बापूंच्या कृपाआशीर्वादाने व सद्यपिपा श्री आप्पासाहेब दाभोळकर यांच्या प्रवचनाने सांघिक उपासनेला सुरवात झाली. उपासना सर्वप्रथम जाखमाता मंदिर , तुंगार्ली येथे होत असे.
|| आला रे हरी आला रे ||




बापूप्रेमाचा ओघ वाढत गेला व मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २००१ रोजी परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे चिन्मय पादुका रूपाने केंद्रात आगमन झाले.
संयोजक श्री रवींद्रसिंह गुप्ते व श्री आशिषसिंह राणे यांच्या मार्गदर्शनामुळे उपासना वाढीस लागली.
वाढत्या संख्येमुळे उपासना ४ जानेवारी २००३ रोजी वि. पी. एस हायस्कुल मधील प्रकाश हॉल येथे घेण्यात आली.
श्री आप्पासाहेब दाभोळकर, श्री विजयसिंह भिंगार्डे, सौ. शीलावीरा चौबळ यांचे अनिरुद्ध महिमा वरील गुणसंकीर्तन कार्यक्रमामुळे भक्तांची बापुंसाठी ओढ वाढू लागली.
 केंद्रात आज विविध सेवा भक्ती चे कार्यक्रम नीयमितपणे रावबविले जातात.

No comments:

Post a Comment