केंद्रामधील भक्तीप्रधान सेवांविषयक

          लोणावळा उपासना केंद्रातील भक्तीप्रधान सेवांमधील घडामोडी येथे नमूद करत आहोत.
बापूंच्या कृपाशीर्वादाने लोणावळा उपासना केंद्रात अनेक भक्ती व सेवे चे कार्यक्रम राबविले जातात.
  • शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश ०२-MH१२-०२०" अंतर्गत तळेगांव दाभाडे येथे "रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण" आयोजित करण्यात आले होते. ह्या उपक्रमामध्ये लोणावळ केंद्रातील कार्यकर्ते व भक्तांनी सहभाग घेतला.
  • १५ ऑगस्टनिमित्ताने लोणावळा उपसना केंद्रातर्फे बापु निवास तुंगार्ली येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात केंद्रातील भक्त व कार्यकर्ते सहभागी झाले.
  •  सोमवार दि. २८ जुलै २०१४ रोजी  "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड अंतर्गत "वृक्षारोपण सेवा" आयोजित करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत लोणावळ्यामधील "गोल्ड व्हॅली- तुंगार्ली" येथे विविध प्रकारच्या ४५० "फॉरेस्ट ट्रीज" ची लागवड करण्यात आली.
    यात लोणावळ उपसना केंद्रातील १८ भक्त व कार्यकर्त्यांचा सहभाग होता
  •  दि. ०४ जुलै २०१४ रोजी "श्रीपुरुषार्थ मंडलम कलश" अंतर्गत लोणावळा, वडगांव, तळेगांव या केंद्रांची "प्रथमपुरुषार्थ धाम- डूडूळ गांव" येथे श्रमदान सेवा संपन्न झाली. या सेवेत केंद्रातील श्रध्दावान सेवकांनी सेवा केली.
  • दि. ३ जुलै २०१४ रोजी लोणावळा उपासना केंद्रात "बेलफळांचा गर" काढण्याची सेवा आयोजित करण्यात आली होती. वरील सेवेत श्रद्धावान व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला व काढलेला गर पुरुषार्थधाम येथे पोहोचवण्यात आला.
  •  चरखा योजने अंतर्गत लोणावळा उपासना केंद्रात ८ चरखे कार्यरत आहेत. आत्तापर्यंत लोणावळा उपासना केंद्रा कडून ३६५६ लडी मुंबई येथे देण्यात आल्या.
  • चारा योजने अंतर्गत लोणावळा उपासना केंद्रातून ३०किलो चारा गोविद्यापिठ्म, कर्जत येथे जमा करण्यता आला आहे.
  • जूने ते सोने या योजने अंतर्गत लोणावळा उपासना केंद्रातर्फे विविध गावांचा सरवे करण्यात आला व त्या नंतर त्या गावांमध्ये( ठाकूरवाडी, कुसगाव,धनगरवाडी, उदयवाडी ) कपड्याचे वाटप करण्यात आले.
  • मायेची ऊब या योजने अंतर्गत केंद्र काढून मुंबई येथे १२८० गोधड्या देण्यात आल्या.
वर्ष २००३ - एकूण गोधड्या १४
वर्ष २००४ - एकूण गोधड्या ४१
वर्ष २००५ - एकूण गोधड्या ४५
वर्ष २००६ - एकूण गोधड्या १०७
वर्ष २००७ - एकूण गोधड्या १०४
वर्ष २००८ - एकूण गोधड्या ७०
वर्ष २००९ - एकूण गोधड्या ७७
वर्ष २०१०- एकूण गोधड्या ८०
वर्ष २०११ - एकूण गोधड्या ५२
वर्ष २०१३ - एकूण गोधड्या ५०
वर्ष २०१४ - एकूण गोधड्या २०८ आत्तापर्यत.
  •  वृक्षरोपण सेवे अंतर्गत लोणावळा केंद्रा द्वारे लोणावळा परिसरात एकूण ५२१० झाडांची लागवड करण्यात आली आहे.
  • लोणावळा केंद्राच्या सेवे अंतर्गत एकूण २०,०७१ कागदी पिशव्या मुंबई येथे देण्यात आल्या आहेत.
  • केंद्रातर्फे गोविद्यापिठ्म दरवर्षी सेवा राबविण्यात येते.
  • केंद्राच्या कार्यकर्त्याचा पुणे येथे गणपती विसर्जन सेवेत सहभाग.
  • केंद्राचा घोरावाडी येथे महाशिवरात्री दरम्यान लीईन कंट्रोल सेवे मध्ये सहभाग.
  • केंद्रातर्फे दरवर्षी आनंद बालग्राम येथे दिवाळी मध्ये फराळ वाटपाचा कार्यक्रम राबविला जातो.
  • केंद्रातर्फे दरवर्षी २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदनाचा कार्यक्रम बापु निवास तुंगार्ली येथे साजरा केला जातो व त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी व १६ ऑगस्ट रोजी केंद्रातर्फे रस्त्यावर व इतरजागी पडलेले ध्वज गोळा करण्याची सेवा राबविली जाते. 
                  
                  केंद्रात राबवेले जाणारे इतर भक्ती-सेवचे कार्यक्रम 

  • सच्चिदानंद महोत्सव
  • श्री वर्धमान व्रताधीराज
  • श्रावण महिन्यात  घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठन
  • वैशाख महिन्यातील हनुमान चालीसा पठन
  • अश्विन महिन्याच्या नवरात्रीत अशुभानाशिनी स्तोत्र पठन
  • साखळी पादुका पूजन
  • संस्थेच्या सर्व उत्सवांमध्ये सहभाग घेणे
  • श्री मंगलचण्डिका नैमित्तिक प्रपत्ती सोहळा 
  • पंचशील परीक्षेची माहिती व मार्गदर्शन 
  • रामनाम वही भू-अर्पण सेवा
  • रामनाम वही पुठ्ठे हवन सेवा
  • पुणे येथील सफला एकादशी कार्यक्रमात सहभागी होणे.
  • वर्षाच्या शेवटच्या दिवशी सामुहिक मंत्र व स्त्रोत पठन.

No comments:

Post a Comment